चोपडा तालुक्यातील मामलदे येथील शेतकरी गोपाळ राजाराम महाजन यांच्या शेतात दि १४ नोव्हेंबर रोजी एक माकड जखमी होऊन शेतात आले होते.परंतू त्या माकडाची शारीरिक स्थिती अत्यंत अस्तव्यस्त असल्याने त्याच शेतात त्याची प्राणज्योत मालवली.गावकऱ्यांना ही बातमी कळताच गावकऱ्यांनी शेतात मोठ्या प्रमाणात गर्दी केली.माकड हे जरी प्राणी मात्रात गणले जात असले तरी हिंदू संस्कृतीत त्याला धार्मिक महत्व आहे याचाच आशय घेत गावकऱ्यांनी अत्यंत भावनाशील होत माकडाचा अंत्यविधी, उत्तरकार्य, दशक्रिया विधी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. अंत्यविधीसाठी डोली देखील सजविण्यात आली होती.गावाने बारा दिवसाचा दुखवटा(सुतक) पाळले असून रोज रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि.२३ रोजी दशक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. दशक्रियाच्या विधीत अनेकजण केस देणार आहेत तसेच दि २५ ला संपूर्ण गावाला उत्तरकार्या निमित्त अन्नदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात गावातील प्रत्येक घटकाने सहभाग घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *