करमाळा । सुपरफास्ट रेल्वेच्या धडकेने शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

करमाळा । करमाळा तालुक्यातील केत्तुर नंबर दोन येथील नेताजी सुभाष विद्यालयात दहावीत शिकणारा विद्यार्थी सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेची धडक बसून मृत्यूमुखी पडल्याची घटना पारेवाडी-जिंती दरम्यान घडली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव तानाजी दत्तात्रय पवार (वय 16) असे आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तानाजी आपल्या मूळगावी गुलमोहरवाडी येथे गेला होता सोमवार (ता. 18) रोजी तो गावाकडून शाळेसाठी केतूरला जात असताना 9.45 च्या दरम्यान रेल्वे मार्गाच्या कडेने जात असताना समोरून येणाऱ्या बेंगलोर-नवी दिल्ली (गाडी नंबर 12627)कर्नाटक(के.के.)सुपरफास्ट एक्सप्रेसने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेने तो जागीच ठार झाला. याबाबत पारेवाडी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस अनिल पाटील यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना व करमाळा ग्रामीण पोलिसांनाही कळविली. करमाळा ग्रामीण पोलीस बोराडे हे पुढील तपास करत आहेत. तानाजी यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *