प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, बुलडाण्यातील घटना

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये एका पुलाखाली हत्या करून अज्ञात इसमाचा मृतदेह आणून टाकला असल्याची घटना उघडकीस आली होती. मृतकाच्या खिशात असलेल्या औषधांच्या बॅच नंबर वरून पोलिसांनी बारा दिवसात या चॅलेंजिंग हत्येचा छडा लावला. प्रियकराच्या मदतीनेच पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आला.

पाच नोव्हेंबर रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह लोणार तालुक्यातील मातमळ गावाजवळील पुलाखाली आढळून आला होता. या आव्हानात्मक प्रकरणाचा तपास लावत बारा दिवसात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. मृतक हा वाशिम जिल्ह्यातील अमानी येथील असून त्याचे नाव आकाश तायडे आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पत्नी मायावती व गावातीलच सतीश नालटे यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा या दोघांनी काटा काढला. यानंतर मृतदेह लोणार तालुक्यात आणून टाकल्याची कबुली दिली आहे. प्रकरणी पत्नी मायावती व मुख्य आरोपी सतीश याचा साथीदार दीपक या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सतीश नालटे हा अद्याप फरार आहे. फक्त औषधांच्या बॅच नंबरवरून या आव्हानात्मक प्रकरणाचा पोलिसांनी बारा दिवसात छडा लावल्याने तापसातील पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *