पोलिस निरिक्षक काकडे यांच्या स्तुत्य ऊपक्रमाने शहरातील जनता गेली भारावून.

प्रथमच महीला पोलीस व पोलिस पत्नीच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम पोलिस ठाण्यात संपन्न..

      हदगाव शहरातील व ग्रामीण ४०० – ५०० महिलांची उपस्थिती .
हदगांव ( अरविंद जाधव) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  प्रदीप काकडे यांनी हदगाव पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्यापासून आनेक  सामाजिक ऊपक्रम राबविण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात,  प्रत्येक सण हा समाजातील प्रत्येक घटकातील जनतेला सहभागी  करून साजरा करण्यात आला .त्याचा एक भाग म्हणून महिलांसाठी असणारा मकरसंक्रांत हा सण सर्व महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून दि १८.०१.२०१९ पोलीस स्टेशन हदगाव येथे  महिला  नगराध्यक्षापासून ते सामान्य महिला , मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या महालीना  घेऊन  व त्यांचा सन्मान करून हा सण सर्व पोलिसस्टेशनच्या महिला कर्मचारी व पोलिस पत्नी यांच्या तर्फे हळद कुंकू लावून तिळगुळ व  भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमामध्ये वैदु समाजाच्या महीलेचा देखील सन्मान करून एक वेगळा पायंडा पाडण्याचे मुख्य कार्य पो.नि.काकडे यानी केले. त्यामुळे श्रिमंता एवढी आपुलकीची भावना दिनदुबळया ,रंजल्या गांजल्या,मोलमजुरी करणा-या व्यक्ती विषयी असल्याचे त्यांच्या कर्तृत्वातून जावले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला पोलीस कर्मचारी श्रीमती शिंदे यांनी केले .त्यानी मार्गदर्शन करताना सांगितले की महिला या समाजात  दुय्यमस्थानी नसून प्रथम स्थानी आहेत .पोलीस प्रशासना बद्दल  महिलांनी भीती बाळगू नये. तुमच्यावर काही अन्याय झाल्यास तात्काळ माहिती द्या आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत .
     तसेच या कार्यक्रंमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा ज्योती राठोड ,मुख्यधिपिका श्रीमती धुळे, नगरसेविका सौ .भोस्कर,सौ .मुधोळकर,सौ भोळेताई,हुलकाने बाई तसेच मतपिडीत महिला अध्यक्ष रूपा  पाटील ,देशमुख आदीसह शेकडो महीला भगिनीची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाची चर्चा संबध हदगाव तालुक्यात होती.या स्तुत्येकार्यक्रमाचे आयोजन करणा-या पोलिस निरिक्षक प्रदिप काकडे यांचे हदगांव वाशियानी आभार मानून अभिनंदन केले.
विशेष म्हणजे पो.नि.प्रदिप काकडे हे नेहमीच सण ऊत्सोवातून,धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक सलोखा जोपासण्याचा नेहमीच काटेकर प्रयत्न करित असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *