*सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2019 भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार* -सकल मराठा समाज नांदेड.!

 

नांदेड :-  मराठा समाजाचे दैवत राजा शिवछत्रपती यांच्या च आशीर्वादाने माँ साहेब जिजाऊंच्या संस्कारावर महाराष्ट्र भर मराठ्यांची अस्मिता जपन्यांचं काम ज्या मर्द मावळ्यांनी आणि जिजाऊ च्या लेकिनी केले आहे आज 350 वर्षा नंतर सुध्दा त्याच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी नांदेड मधील सकल मराठा समाजानी आपली वज्र्मूठ आवळलीय.

19 फेब्रुवारी 2019 रोजी साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळा हा संघटना, पक्ष विरहित राहील जो शिवरायांचा शिलेदार असेल तो आपली संघटना आणि पक्ष बाजुला ठेऊन केवळ एक शिवरायांच्या विचारांचा पाईक म्हणुन शिवजन्मोत्सव सोहळ्यात दिसेल.

350 वर्षा नंतर एकत्र आलेला मराठा समाज हा येथुन पुढे सुद्धा आपले गट तट बाजुला सारुन आपल्या अंगणातील तुळस आणि मंदिरावरील कळस ज्या राज्यां मुळे आजही उभे आहे त्या राज्यांचा जन्मोत्सव सोहळा हा अतिशय दिमाखात साजरा झाला पाहिजे म्हणुन सकल मराठा समाजातील सर्व शिलेदारांनी आणि जिजाऊंच्या लेकिणी तयारी करण्याची आशा ह्या ठिकाणी व्यक्त केली. यावेळी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी,पत्रकारिता या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती होती, अनेकांनी आपली मते मांडली आणि जास्तीत जास्त मित्र मंडळ, सामाजिक प्रतिष्ठाने, जयंती मंडळ हे गटा गटाने निघण्याऐवजी एकत्र मिळुन कसे निघता येईल याचाच प्रयत्न करू अशी संकल्पना सुध्दा यावेळी मांडण्यात आली.जर का अशी एकत्रित आणि सामुहिक शिवजयंती उत्सव सोहळा साजरा केला तर याचा च आदर्श पुर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेतल्या शिवाय राहणार नाहीत. मराठा क्रांती मोर्चा मध्ये ज्या लाखोंच्या संख्येने समाज एकत्रित आला तो आपल्या लाडक्या राजांच्या जयंती निमित्त सुद्धा एकत्र का येऊ शकत नाही याची पुनरावृत्ती सुद्धा काही शिलेदारांनी यावेळी करून दिली.

या शिवजयंती च स्वरूप थोडक्यात असे राहील की, विविध समित्या गठीत करण्यात येतील आणि कोणीही याचा अध्यक्ष, उपाध्यक्ष राहणार नसून मोर्चा प्रमाणे सर्वांची सामुहिक जबाबदारी असेल.आणि पुर्ण जिल्हावाईस बैठक पुढील काही दिवसात लावण्यात येणार आहे पुढील बैठक ही 20 तारखेला सकाळी 11 वाजता हनुमान मंदिर मंगल कार्यलय ,विजय नगर येथे आयोजित केली आहे असे कळविले.

यावेळी असंख्य समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *