आदिवासींच्या प्रसिध्द तारपाचे सूर कमी होणार !

विरार (मनीष गुप्ता )

काळाच्या ओघात अनेक वाद्ये, किंवा संगीत कमीकमी होऊ लागते आज तीच गत आदिवासींच्या प्रसिध्द तारपा ह्या वाद्य बाबत होताना दिसत आहे हे. वाद्य वाजवणारे कलाकार कमी होऊ लागल्याने येणाऱ्या काळात या वाडयाचे सूर हरपतात कि काय असे वाटू लागले आहे. तारपा नृत्य आदिवासींच्या समृध्द सांस्कृतिक लोकसंस्कृतीचे कोंदण आहे. तारपा नृत्याचा वारसा हा प्रत्येक श्वासातून समूहमनाचा ठेका घेताना दिसतो. जगण्याच्या सजगतेतून प्रथा, परंपरांचा जन्म झाला. तारपा हे खास गावरान बाज घेवून जन्माला आलेले वैशिष्टपूर्ण वाद्य आहे. मात्र आता तारपा वादकांची संख्या घटू लागली असल्याने तारपा वादकांची वानवा कमी भासू लागली आहे.त्यामुळे आगामी काळात तारपा नृत्याचे सुर हरवण्याची चिंता भासू लागली आहे.श्रमजीवी संघटना आता यासाठी पुढाकार घेणार आहे.

लांब भोपळा सुकवून बांबूच्या नळया ताडाच्या झावल्या आणि मेण वापरून हे वाद्य तयार केले जाते.या वाद्यांचा दमmaharashtraदार ध्वनी, निसर्गाशी नाते सांगणारे पोशाख आणि एकमेकांच्या कमरेत हात गुंफून, फेर धरून, नत्यात मग्न झालेले रांगडे आदिवासी तारपा नत्याचा हा बाज आज लोककलेच्या कार्यक्रमामधून आणि वारली चित्रकलेच्या माध्यमातून सर्वांना परिचित झाला आहे.हे नत्य करण्याची एक खास पध्दत आहे.स्त्रीपुरूष एका मागोमाग उभे राहून एकमेकांच्या कमरेत हात गुंफून फेर धरतात. घोल काठी आणि तारपा वाद्य वाजवणारे कलाकार वतुर्ळाच्या मधोमध उभे राहतात.घोल काठी वाजवणारा कलाकार ज्या दिशेने फिरेल त्या दिशेने फिरत अन्य कलाकारांना आणि शिवाय तारपा वादकाला नत्य करावे लागते. आजही काही गावांमध्ये ही परंपरा जपलेली दिसते.

आदिवासी समाज उत्सवप्रिय आहे.तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. निसर्गपूजक आदिवासी समाज होळी, बारस, नवीन आलेले पीक, नवीन भाताची लागवड,प्रत्येक प्रसंग त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते दिवसभर काम करून थकलेला आदिवासी तारप्याचा सूर ऐकल्यानंतर आणि त्याच्यातनृत्याचा नाद संचारल्यावर मग मध्यरात्री पर्यंत तारपा नृत्य चालू असते.हातात हात गोफ गुंडाळून गोल रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर सामुहिक नृत्य केले.तारपा वाजवणारे या वाद्यात मोठया ताकदीने फुंकर मारून विविध प्रकारच्या नत्यासाठी विविध सुर काढतात. तारपा नत्य रात्री खूप वेळपर्यंत चालत असल्याने तारपा वादकाची दमछाक होण्याची दाट शक्यता असते. मात्र हे कलाकार आव्हान पेलण्यात सराईत असतात.गौरी गणपतीचा सण झाला की नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, होळी रंगपंचमीपर्यंत आदिवासी बांधव रोज रात्री गावपाडयावर तारपा नत्य सादर करतात.तारपा नत्य हे आदिवासींसाठी करमणूकीचे प्रमुख साधन असून तारपा वादकांची जुनी पिढी आता वयोवध्द झाली आहे आणि नव्या पिढीचे ताज्या दमाचे कलाकार तयार होताना दिसत नाहीत त्यामुळे तारपाचे दमदार स्वर आणि आदिवासींचे प्रसिध्द डौलदार नत्य कला टिकवण्याच्या मार्गावर आहे.

‘तारपा’ हे वाद्य सुकलेला भोपळा आतून कोरून, पोकळ बनवून हे वाद्य तयार करतात. नृत्य स्थानाच्या मध्यभागी एकजण तारपा वाजवत असतो. एक स्त्री आणि एक पुरुष असे एकानंतर एक गोलाकार हातात हात गुंफून नृत्य करतात. हे नृत्य म्हणजे त्यांच्या एकजुटीचे प्रतिबिंबच आहे. तारपा नाचताना एक बाई एक पुरूष असे कमेरे भोवती हात घालुन रांग बनवुन नाचतात आणि त्या रांगेच्या सुरुवातीला जो पुरुष असतो त्याच्या हातात घुंगरू लावलेली काठी असते , ती ही ठेका धरायला आणि नाचाची दिशा ठरवायला वापरतात. ते गाणं आणि फक्त पुरूष ‘कामडया’ नाचाला असते.

”आदिवासींची बरीच नृत्य आहेत पण तारपा जास्त प्रसिध्द आहे. परंतू त्याचा वारसा टिकवणे आवश्यक आहे. आदिवासी संस्कृतीचा वारसा टिकवणे गरजेचे आहे. नवीन तारपा वादक तयार होणे गरजेचे आहे.” – वसंत भसरा आदिवासी अभ्यासक

”आदिवासींची कला सातत्याने टिकून राहावी या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी श्रमजीवी सन्घटना सातत्याने काम करत आहे काळाच्या ओघात आणि नव्याने झालेल्या मोबाईलच्या आक्रमनातं हि कला टिकावी आणि एका पीढिकडून दुसऱ्या पिढीकडे जावी यासाठी संघटनेच्या माध्यमातून आनंद मेळावे तालुका तालुक्यात आयोजित करण्यात येत आहेत यात तारपा नृत्य, गौरी नृत्य ,’डोल नाच’ याना प्राधान्य दिले जात आहे. येणाऱ्या काळात तारपा वादकांची संशय वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *