प्रगती एक्स्प्रेस पाच दिवस रद्द

पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस येत्या बुधवारपासून (१६ ऑक्टोबर) रविवारपर्यंत (२० ऑक्टोबर) रद्द करण्यात आली आहे. खंडाळा येथे मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रगती एक्स्प्रेससह अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर १७ ते १९ ऑक्टोबर, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर १५, १६ आणि २० ऑक्टोबरला, पनवेल-नांदेड स्पेशल गाडी २० ऑक्टोबर रोजी रद्द केली आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस १५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर अशी धावणार आहे. हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेसही १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान पुण्यापर्यंत धावेल. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान पुण्यातून हैदराबादला रवाना होईल. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस १७, १८, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी पनवेलऐवजी पुण्यातून नांदेडसाठी धावेल. नांदेडहून येणारी गाडी पुण्यापर्यंतच धावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *