चिखली पोलीसांनी पकडला लाखोंचा गुटखा, एकास अटक एक फरार

बुलढाणा ( योगेश शर्मा )

चिखली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेरुशाह बाबा दर्गा परिसरात शासन प्रतिबंधीत गुटख्याची चोरुन लपून विक्री होत असल्याची माहीती मिळाल्यावरुन चिखली पोलीसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली. यावेळी पोलीसांनी एकास अटक केली असून एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला.
याप्रकरणी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चिखली शहरात चोरुन लपून शासन प्रतिबंधीत गुटखा विक्री करणारा अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी याने खेरुशाह बाबा दर्गा परिसरात गुटखा आणून जहीर खान अजीज खान याचे घरात लपवून ठेवत आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या निर्देशाखाली पोहेकॉ विक्रम काकड, नारायण तायडे, प्रकाश पाटिल पो.ना. राहुल मेहुणकर, पो कॉ. पुरुषोत्त्म आघाव, गजानन जाधव पोकॉ सुनिता इंगळे यांनी पंचासह पायी जावून धाड टाकली असता जहिर खान अजीज खान याचे राहते घराचे समोर घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन मोठया पांढऱ्या पोत्यांमध्ये राजनिवास सुगंधित पानमसाला व नऊ पांढऱ्या रंगाच्या पोतडया आढळून आल्या . त्या उघडल्या असत्या त्यामध्ये 28 पोतडे शासन प्रतिबंधीत गुटखा गुटखा मिळून आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे तर जहीर खान अजीज खान यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर माल ताब्यात घेऊन पंचनामा करुन गुटखा पोलीस स्टेशन चिखली येथे जमा करण्यात आला आहे.
चिखली पोलीसांनी या कारवाईची माहिती अन्नं व औषध अधिकारी यांना कळविली असल्याचे सांगितले मात्र वृत्त लिहीपर्यंत अन्नं व औषध विभागाचा कुणीही अधिकारी चिखलीला फिरकला नव्हता. तर अधिकारी वर्गाशी पत्रकारांनी संपर्क करण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.यापुर्वी दि 16 सष्टेंबर 2019 रोजी देखील पोलीसांनी घाड टाकून 3 लाख 64 हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *