‘नटरंग’सारखे हातवारे करत नाही, फडणवीसांचा टोला

जळगावः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘नटरंग’सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नाही, असं सांगत फडणवीस यांनी पवारांना टोला लगावला

आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर केली होती. या टीकेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील सभेत शरद पवार यांनी उत्तर दिलं. ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही’ असं म्हणत पवारांनी हातवारे केले. त्यांच्या या टीकेवरून राजकीय चर्चा रंगल्या. आता शरद पवार यांच्या या टीकेला आज मुख्यमंत्र्यांनी जळगावमधील सभेतून प्रत्युत्तर दिलं.

काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती वाईट आहे. पवारांच्या पक्षामध्ये कुणी रहायलाच तयार नाहीए. आधे उधर जओ, आधे इधर जाओ और कोई बचे तो मेरे पिछे आओ अशी पवारांची अवस्था आहे. यामुळे इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलेले राष्ट्रीय नेते पवारांना आता पराभव दिसू लागल्याने त्यांची विवेकबुद्धी कामी व्हायला लागलीय. म्हणून पवार साहेब कशा प्रकारे हातवारे करून बोलत आहेत हे आपण काल बघितलं. उत्तरं आम्हालाही देता येतात. पण असे हातवारे आम्ही कधी केले नाही. आम्ही नटरंगसारखं काम कधी केलं नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नाही. २४ तारखेला महाराष्ट्राची जनताच दाखवेल कोण करा पैलवान आहे. कुणाला विजय मिळालाय हे दिसेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *