उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांची जोरदार कारवाई, जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

उस्मानाबाद । उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जवळपास 30 गायी पकडल्या तर परंडा येथील अवैध कत्तल खान्यावर छापा मारून सात जिवंत गायींसह 6 मेट्रीक टन गोवंश मांस जप्त केले आहे. कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या गाड्या पकडल्या असून कळंब तालुक्यातील पोलिसांनी दमदार कारवाई केली आहे. यासंदर्भात पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी ही दमदार कारवाई केली आहे. गाय कत्तलीसाठी नेण्यात येणारे तिन टेम्पो पकडले त्यात 29 गाई तीन बैल दोन रेडकू आणि टेम्पो असा जवळपास 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस उपअधीक्षक सुरेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तर दुसरीकडे रो रात्री जुना खानापूर रोडवर लतीफ दगडू कुरेशी यांच्या शेतात चालनाऱ्या अवैध कत्तल खान्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB), उस्मानाबादच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनानुसार छापा मारला. यावेळी आयशर ट्रक मधून सुमारे 6 मेट्रीक टन गोवंशीय जनावरांचे मांस यासह एकुण 24,19,000/- रु. चा माल जप्त करण्यात आला. 7 जणांविरुद्ध विरुध्द पोलीस ठाणे, परंडा येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *