सत्ता लवकर स्थापन करा अन्यथा शेतकरी संघटना आसूड उगारणार – शेतकरी नेते रघुनाथ पाटील

सांगली । राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्री कोणाचा यांच्या खेळात शेतकऱ्याचे हाल होत आहेत. सत्ता लवकर स्थापन करा अन्यथा शेतकरी संघटना आसूड उगारणार असा इशारा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. विधानसभा होऊन 20 दिवसांहून अधिक दिवस झाले मात्र अद्याप सरकार स्थापन झाले नाही. भाजप म्हणतंय आमचं सरकार येणार तर दुसरीकडे महाशिवआघाडी म्हणते आमचे सरकार स्थापन होणार. मात्र यांच्या खेळात शेतकरी मरत आहे. शेतकऱ्यांना त्वरित मदत नाही मिळाली तर आम्हाला आसूड हातात घ्यावा लागेल असा गर्भीत इशारा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *