‘सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामध्ये एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याचे प्रमाण जास्त आहे. विकासाचे मुद्दे, ग्रामीण भागातील मुद्दे, यावर फारसे कोणी बोलताना दिसत नाही. मात्र, प्रचारात फक्त नेत्यांचे वाद नकोत, तर पुढील पाच वर्षांमध्ये कशा पद्धतीने विकासाचा अजेंडा राबविणार, यावरही भर देण्याची गरज आहे,’ असे मत आयबीएमआरडी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

‘पूर्वीची व आताच्या प्रचार पद्धतीमध्ये फार बदल झाला आहे. सध्याच्या प्रचारामध्ये एकमेकांवर टीका करण्यावर भर दिसतोय. मात्र, त्याऐवजी विकासाचा अंजेडा घेऊन त्यावर बोलण्याची गरज आहे,’ असे मत आकाश वाणी या विद्यार्थ्याने मांडले. ‘निवडणूक जवळ आल्यानंतर उमेदवार येतात. बऱ्याचदा ते नंतर पाच वर्षे दिसत देखील नाहीत. उमेदवारांनी प्रचार करताना केवळ आश्वासने देण्यापेक्षा मतदारांना नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत, ती करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, या प्रत्येकांचे प्रश्न वेगळे आहेत. त्याकडेही पाहण्याची आवश्यकता आहे,’ असे अमोल गव्हाणे म्हणाला. ‘निवडणुकीतील प्रचाराचे नियोजन हे योग्य पद्धतीने असावे,’ असे मत नेहा शिंदे हिने व्यक्त केले. तर, ‘निवडणूक आल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी आठवतो. त्यानंतर पाच वर्ष शेतकरी कुठे दिसतच नाही. निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येते,’ अशा भावना तरुणांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *