स्व.मुंडे साहेबांकडुन कठीण परिस्थितीत लढण्याची प्रेरणा मिळते- फुलचंद कराड

परळी वैजनाथ:-
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या या कार्यातुन कठीण परिस्थितीत लढण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंद यांनी केले.कराड यांच्या हस्ते तेलघणा ता.अंबाजोगाई येथील लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे चौक व नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तेलघणा येथील ग्रामस्थांच्या वतिने गावातील चौकास स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देण्यात आले.या चौकाचे व नामफकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना कराड म्हणाले की,आज संपुर्ण महाराष्ट्र ज्यांच्या कार्याची व योगदानाची महंती गात आहे त्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत राजकिय,सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी मला मिळाली.महाराष्ट्रातील शेतकरी,शेतमजुर,ऊसतोड कामगार यांच्या आयुष्यात सुबत्ता यावी म्हणुन त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.त्यांच्या या कार्यातुन प्रत्येकाला कठीण परिस्थितीत लढण्याची प्रेरणा मिळते असे सांगुन स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने करण्यात आलेल्या चौकाचे व फलकाचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे सांगीतले.यावेळी सुधीर सिरसाट, रामराम सिरसाट, बन्सी आण्णा सिरसाट, सुदाम केंद्रे, नेताजी देशमुख, दत्ता जाधव, बिभिषण गित्ते, मच्छींद्र वालेकर, बाळु सिरसाट, राजु सिरसाट,संदिपान आंधळे, माऊली फड , ज्ञानेश्वर कांदे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *