जिल्हा गॅझेटीयर प्रकाशन कार्यक्रमाचा ग्रंथदिंडीने प्रारंभ.

दिंडीमध्ये जिल्हाधिकारी यांनी  धरला ठेका

 

बुलडाणा :  -जिल्हा गॅझेटीयर प्रकाशन कार्यक्रम आज 14 जानेवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या प्रकाशन कार्यक्रमास ग्रंथदिंडीने प्रारंभ करण्यात आला. स्त्री-पुरूष समानता ग्रंथाच्या रचयिता, जिल्ह्याचे साहित्यभूषण ताराबाई शिंदे यांच्या निवासापासून ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला. ग्रंथदिंडीमध्ये पारंपारिक वेषभुषेत ठेका सहभागी व्यक्तींनी ठेका घेतला. या ठेक्याचा मोह जिल्हाधिकारी यांनाही आवारता आला नाही. जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ग्रंथदिंडी पोहचताच दिंडीचे स्वागत केले व फुगडी  खेळून ठेका धरला. यावेळी ग्रंथदिंडीतील महिलांनीही प्रतिसाद दिला.

 

ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  ग्रंथांचे महत्व सांगणारी घोषणा फलक घेवून विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ग्रंथदिंडी बाजार लाईन, जिल्हा न्यायालय परिसर व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, सचिव दिलीप बलसेकर आदी उपस्थित होते.

 

                                                                        ******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *