१८ लाखांचा गुटका जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

बुलढाना:- जिल्ह्यात एका पाठोपाठ एक करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास १८ लाख ६६ हजार रुपयांचे प्रतिबंधित गुटका जप्त,करण्यात पोलिसांना यश आले असून याची सरकारी किंमत18 लाख असली तरी काळ्या बाजारात या मालाची कीमत जवळपास ४७ ते ४८ लाख रुपये सांगितली जात आहे. नेहमीप्रमाणे या कारवाईत देखील प्यादे पकडण्यात आले असून मुख्य सूत्रधार पडदया मागेच आहे

महाराष्ट्र राज्य सरकार ने सुगंधित तंबाकु, पान मसाला व गुटकयाची विक्री वर प्रतिबंध लावलेले असून सुद्ध्य राज्यभरात सरकारी आदेशाची खिल्ली उडवत केराची टोपली दाखवित खुलेआम गुटकयाची वीक्री धड़ल्ल्याने होत आहे. जिलह्यात एका नंतर एक झालेल्या दोन वेगवेगळ्या कारवाई मधे जवळपास 18 लाख 66 हजार रुपयांचे प्रबंधित गुटका पोलिसांनी जप्त करून 4 लोकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ब्लैक मार्केट मधे या गुटकयाची कीमत जवळपास 47 ते 48 लाख रुपये सांगितली जाते.
राज्या मधे मागील काही वर्षा मधे साशनाने आरोग्यास हानिकारक असे गुटखा , सुगंधित तंबाखू , पानमसाला आदि हानिकारक वस्तुंवर बंदी घातलेली आहे, परंतु साशनाचे असे आदेश असले तरीही, राज्यात ही बंदी फक्त कागदा पूर्तिच मर्यादित आहे अशी दिसते.
संबंधित अधिकाऱ्यांचे साटेलोटयामुळे बाहेरिल राज्यातुन येथील गुटखा माफिया गुटखा आणुन खुल्या बाजारात सर्रासपने विकत आहे.

4 फेब्रूवारीला मोरक्या द्वारे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा लोकल क्राइम ब्रांचच्या पथकाने बुलढाणा येथे एका स्विफ्ट कारला अडवून झड़ती घेतली असता त्यामधे प्रतिबंधित अवैध गुटखा नेत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी 2 युवकांना ताब्यात घेउन विचारपूस केली असता बुलढाणा जिल्ह्यातीलच रायपुर येथून हा गुटखा आनल्याची माहिती मिळाली, तेव्हा एलसीबीचे एक पथक रायपुर येथे जाऊन स्थानिक रायपुर पोलिसांच्या मदतीने गावा बाहेरिल कडेवर असलेल्या घरामधे धाड टाकली, ज्या मधे जवळपास 14 लाख 8 हजार रूपयांचा गुटखा ताब्यात घेउन दोन लोकांवर गुन्हा नोंदवला. या करवाई ची सूचना अन्न व औषध विभागला दिल्या वर या विभागाचे अधिकारी घटना स्थळावर जावून पंचनामा केला. रायपुर पोलिस स्टेशन मधे दोन आरोपींवर गुन्हा नोंदविला गेला.
◆ विशेष म्हणजे जिल्ह्यामधे झालेल्या या करवाई नंतर पोलिस आणी फ़ूड एंड ड्रग्ज विभाग आपली पाठ स्वतः थोपटतांना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रश्नांच्या घेऱ्यामधे उभी दिसत आहे. जेव्हा पासुन राज्यामधे गुटक्या वरती पूर्णपणे बंदी घातलेली आहे, तेव्हा पसुन गुटखा माफिया सक्रिय झालेले आहे. ज्याची माहिति फ़ूड एंड ड्रग्ज आणी पोलिसांना याची पूर्णपणे जाणीव आहेच. परंतु करवाई च्या नावाखाली आज पर्यन्त सावरासावरच होतांना दिसुन आले आहे.
असे बोलले जात आहे कि, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामधे गुटक्याचा मोठा व्यपारी आजही आपली छाती तानून ठाम उभा आहे, ज्याचा व्यापार राज्यातील कित्तेक जिल्ह्यात सर्रासपने सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक वेळा प्रतिबंधित गुटक्याच्या गाड्या धरल्या गेल्या, तरीही करवाई च्या वेळी आरोपी काही असे असतात की त्यांची हलाखीची परिस्तिति आणी बिकट आर्थिक परिस्थितिने भेडसावलेला व्यक्तिच असतो. या भाडोत्री लोकांना धरल्या गेलेले लाखोंच्या घरात असलेले मालाचे मालिक दाखवून यांच्यावर कार्यवाही केली जाते .आता पर्यंत झालेल्या अनेक कारवाई मधे जर आरोपींचे इतिहास बघितले तर ते दोन वेळचे जेवन सुद्धा जमवू शकत नही. परंतु आजपर्यंत स्वताच्या आर्थिक स्वार्थापोटी फूड एंड ड्रग्ज आणि पोलिस डिपारमेंटचे व्यक्ति सबळ पुरावा नसल्याच्या नावाखाली मुख्य आरोपीला वेळोवेळी सोडून त्याने दिलेल्या भाडोत्री आरोपीवर याचे खापर माथी फोडून त्याला आरोपी घोषित करत आलेले आहेत.
आज वेगवेगळ्या झालेल्या दोन करवाई मधे जे आरोपी धरल्या गेले आहेत ते फार संदेहास्पद आहे.
गुटखा किंग च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्याला सोडून काही पैश्या साठी भाडयाने आणलेले लोकांवर्ती करवाई करुन स्वताची पाठ थोपटन्यात बहुतेक पोलिस आणि फूड एंड ड्रग्ज विभागाला आनंद वाटते,असेच समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *