दुष्काळी उपाययोजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभे करू. मदनराजे गायकवाड यांचा इशारा

बुलढाणा : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेसाठी शासनाने अनेक योजना व सुविधा जाहीर केल्या आहेत, मात्र अद्यापही या योजनाची माहिती अनेक शेतकर्याना नाही तसेच अधिकारी वर्ग या योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनात आले आहे. आधीच जनता दुष्काळात होरपळून निघत आहे त्यातच अधिकारी वर्गाच्या या कारभाराला जनता वैतागली असून या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार चिखली यांना दिला आहे.

आपल्या दिलेल्या निवेदनात मदनराजे गायकवाड यांनी तहसीलदार याच्याकडे विविध प्रकारची माहिती मागितली आहे. यामध्ये जमील महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाचया वीज बिलात ३३.५० % सूट, शालेय महाविद्यालय विध्यार्थीच्या परीक्षा शुल्कात माफी, रो ह यो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता , आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चा वापर, टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शासनाने दुष्काळासंबंधी जाहीर केलेली सहिता मराठी भाषेतून असावी, या सर्व सवलती ज्या शेतकरी लाभार्थी यांना देण्यात आल्या आहेत त्याची नावासह यादी, पाणी टंचाई भागात अधिग्रस्त करण्यात आलेल्या विहिरीची माहिती, टँकरची माहिती. तालुक्यातील एकूण जलसाठा व तालुक्यातील पशुधनास एप्रिल २०१९ परेंत पुरेल एव्हडा चारा उपलब्धताबाबत माहिती, त्याचप्रमाणे प्रशासनाने तालक्यातील सगळ्या सार्वजनिक विहिरींचा गाळ काढवा, मनरेगा योजनेची प्रभावी अमलबजावणी करावी, अनुदानित अन्नधान्यसाठी शिधापत्रिका द्यावी, दुष्काळी भागात दिव्यांग, निराधार, वृद्ध ,पिडीत, अशा लोकांसाठी सामुहिक स्वयंपाकघराची मागणी देखील करण्यात आली आहे.

वरील माहिती ७ दिवसाच्या काळात न मिळाल्यास मनसे स्टाईल आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला असून निवेदनावर जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड, गणेश बरबडे, शैलेश गोंधने, प्रदीप भवर, राजेश परिहार, विनोद खरपास, शैलेश कापसे, शे. अजहर याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *