चिखली येथील रखडलेले चुकारे,व भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत…

जिल्हाधिकारी यांचे आदेश रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश…

चिखली–तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या माध्यमातुन झालेल्या उडीद,तुर,हरभरा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याने शेतकर्याचे चुकारे अडकुन पडल्याने रयत संघटनेचे विदर्भध्यक्ष प्रशांत ढोरे,जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी शेतकर्याचे चुकारे तात्काळ देण्यात यावे,व झालेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी केली होती.दरम्यान दि१६जानेवारी २०१९रोजी जिल्हाधिकारी यांनी शेतकर्याचे रखडलेले चुकारे व चौकशीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
आधारभुत खरेदी योजने अंतर्गत शासनाकडुन सन२०१७-१८मध्ये चिखली जिनिंग अँन्ड प्रेसिंग संस्थेच्या माध्यमातुन उडीद,तुर,हरभरा खरेदी करण्यात आली होती.१वर्षाचा कालावधी उलटुनही खरेदीमध्ये अनागोंदी कारभार झाल्याने काही शेतकर्याचे पैसे अडकुन पडले आहेत.याबाबद रयत क्रांती संघटनेकडुन तिन महिण्यापुर्वी लोकशाही मार्गाने पाच दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आल्याने व नियमीत पाठपुराव्याच्या माध्यमातुन गरजु शेतकर्याना न्याय हि मिळाला होता.परंतु उडीद खरेदीमध्ये जे झाले तेच तुर,हरभरा खरेदीमध्ये होत असल्याने रयत संघटना व शेतकर्यानी रखडलेले चुकारे देण्यात यावे,मनमानी कारभार करणे,शेतकर्याचा खरेदी केलेला माल शासनजमा होऊनही पैसे न देणे,लाँट एन्ट्रीचे आदेश असुनही एँन्ट्री न करणे,तुर न देणार्याच्या खात्यावर पैसे टाकणे,शेतकर्याची आँफलाईन नोंद असत्यांना दिलेले कागदपत्रे आँनलाईन न करणे,यासह इतर मुद्दे व आलेल्या तक्रारीची चौकशीसाठी जिनिंग कार्यालया समोर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.परंतु सदर परीसरात जाळपोळ झाल्याने संवेदनशील एरीया दाखवत उपोषणाचा डाव हाणुन पाडण्यात आला होता.दरम्याण शेतकर्यासह रयत संघटनेकडुन आक्रमक पावित्रा घेत तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने आज दि१६जानेवारी२०१८रोजी जिल्हाधिकारी यांनी शेतकर्याचे रखडलेले चुकारे,भ्रष्टाचाराची चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमली असुन प्र जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार चिखली,जिल्हामार्केटिंग अधिकारी बुलढाणा,विदर्भ मार्केटिंग फेडरेशन मलकापुर असी समिती गठीत करण्यात आली असुन चिखली तालुक्यातील तुर,हरभरा,मुंग,खरेदी संदर्भात असलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी.अर्जात उपस्थीत मुद्दे बाबत आवश्यक ती चौकशी करुन त्याबाबदचा अहवाल आठ दिवसाच्या आत कार्यालयास सदर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी पत्राव्दारे दिले आहेत.

______________________________ आत्मदहनाचा इशारा देणार्या चौथे परीवारास मिळाला न्याय….

शेतकर्याचे चुकारे मनमानी कारभार,अनागोंदी कारभारामुळे अडकुन पडल्याने आंधई येथील चौथे परीवाराने पैसे न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.याबाबद रयत संघटनेचे प्रशांत ढोरे,विनायक सरनाईक यांनी मलकापुरचे कार्यालय गाठुन पेटकर यांना घेराव घालुन जाब विचारण्यात आल्याने व शेतकर्याचे पैसे त्वरीत जमा करण्याची मागणी केल्याने दरम्यान चौथे व इतर शेतकर्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याने शेतकर्याना न्याय मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *