एकदिवसीय राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

 

 

बुलढाणा :- खामगाव रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 ला खामगाव मध्ये तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे.सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन संपन्न होत असून संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे राज्यस्तरीय युवा मराठी, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने खामगाव शहरात युवा साहित्यिक व मान्यवरांची मांदियाळी राहणार आहे.

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ , टॉक शो, कविसंमेलन ,युथ आयकॉन अवार्ड वितरण सोहळा, समारोप समारंभ व गझल मुशायरा कार्यक्रम या मध्ये राहणार आहे. संमेलनाच्या

उद्घाटन समारंभाला संमेलनाध्यक्ष म्हणून  साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा कादंबरीकार नवनाथ गोरे ,उद्घाटक म्हणून  सुप्रसिद्ध अभिनेता व लेखक राजकुमार तांगडे  तसेच प्रमुख अतिथी  म्हणून आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश ,आमदार अॅड. आकाश फुंडकर प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य मोठ्या संख्येने साहित्यकांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *