पोलीस प्रशासनातर्फे दोन्ही गटावर गुन्हे दाखल, आ. राहुल बोंद्रे यांच्यासह २०० ते २५० जण आरोपी.

काल दि. २२ फेब्रुवारी रोजी धोडप येथील शाळां आय एस ओ साठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषनातुन काँग्रेसचे आ राहुल बोंद्रे व भाजपा नेत्या तथा जि.प महिलाव बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्यातच संतोष काळें या भाजपा कार्येकर्त्याला मारहाण झाल्यानंतर त्याची तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्योवळंी मोठया प्रमाणात तणाव निर्माण झाला होता व गर्दिला पांगवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमारदेखील करावा लागला. याचा प्रसाद काँग्रेस व भाजपाच्या अनेक नामांकीतांना बसला. या प्रकारणी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असुन महत्वाचे म्हणजे पोलीस प्रशासनानेदेखील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्यामुळें भाजपा व काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये आ. राहुल बोंद्रे, शिवराज पाटील यांच्यासह २०० ते २५० जणांना आरोपी बनविण्यात आले आहे.

या प्रकरणी अप.क्रं.९१/२०१९ अन्वये फिर्यादि सौ. आशा गजानन शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सौ. आशा शिरसाठ या आपला भाऊ संतोष काळें यांच्या सोबत येवता येथे मोटारसायकलने जात असतांना राहुल सवडतकर, दिपक सवडतकर,सुरेश सवडतकर, गजानन परीहार यांच्यासह इतर तिन अनोळंखी व्यक्तींनी स्थानीक महाबीज ऑफीस समोर पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीने येवून फिर्यादी सौ. आशा यांना शिवीगाळं केली व संतोष काळें यास मारहाण करुंन जिवे मारण्याची धमकी दिली. व हातातील अंगठी, गळंयातील चैन व १५ हजार रुंपये रोख हिसकावून घेतले अशी तक्रार चिखली पोलीस स्टेशनला दिली. यावरुंन पोलीसांनी भांदवी कलम ३४१,३५४,३९२,३२३,१४३,१४७,१४८,१४९ व १३५ मुंबई अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पी.एस.आय. तानाजी गव्हाणे हे करीत आहेत.

तर फिर्यादी राहुल नंदकिशोर सवडतकर यांच्या फिर्यादीनुसार, २२/०२/२०१९ रोजी खैरव येथुन भुमिपुजन कार्यक्रमातून येत असतांना मेहकर फाटा येथे सायंकाळंी ५.३० ते ६.०० वाजेच्यादरम्यान गाडी अडवून संतोष काळें, ऋषभ पडघाण, शिवाजी पडघाण, बबन राऊत , पवन चोपडा व इतर आठ लोकांनी शिवीगाळं करुंन मारहाण केली व गळंयातील ४ तोळें सोन्याचा गोफ, १० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठया असे एकूण १ लाख २५ हजार रुंपयांचा ऐवज हिसकावून घेतला तसेच यावेळंी फिर्यादीची आत्या रेखाताई पवार या भांडण सोडवण्याकरिता आल्या असत्या त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली व विनयभंग केला. या फिर्यादीवरुंन पोलीसांनी उपरोक्त सर्वांच्या विरोधात अप. नं. ९४/२०१९ भांदवी १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ३९५, ३५४, २९४, ३२३,५०६ व मुंबई अधिनियम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय मोहन पाटील करीत आहे.

या उपरोक्त फिर्यादी दाखल करण्यासाठीं दोन्ही जमाव पोलीस स्टेशनला समोरासमोर आला. पोलीसांनी संयमाने परिस्थिती हाताळंण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तेव्हा जमावाने पोलीसांवर दगडफेक केली त्यामुळें ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थीती अधिकच तणावपूर्ण बनली होती. यावेळंी जमावाने पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या पोलीसांच्या वाहनाला व पत्रकारांच्या दुचाक्यांना देखील आपले लक्ष बनविले व त्याचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळें पी.एस.आय. मोहन पाटील यांच्या फिर्यादीवरुंन आ. राहुल बोंद्रे, राहुल सवडतकर, रमेश सवडतकर, बाळूं साळांेख, सत्येंद्र भुसारी, नंदकिशोर सवडतकर, अतरोद्दीन काझी, डॉ. महम्मद इसरास, प्रदिप पचेरवाल, रफीक कुरेशी, खलील बागवान, सचिन बोद्रे, तुषार बोंद्रे, व्यंकटेश बोंद्रे, पप्पु देशमुख, अवान जमादार, सचिन शिंगणे, किशोर साळंवे, प्रदिप साळंवे, अब्दुल वाशिद जमादार, योगेश जाधव, शे. आसीफ, रामभाऊ जाधव, किशोर कुहीटे, गजानन परिहार, दिपक खरात, लक्ष्मण अंभोरे, शिवराज पाटील, ऋषभ पडघाण, संतोष काळें, मनिष गोंधणे व इतर २०० ते २५० लोकांवर अप.न.९३/२०१९ कलम भांदवी १४३,१४५,१४७,१४८,१४९,३५३,३३२,४२७,२९४, कलम ३ सार्वजनीक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १३५ मुंबई पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करुंन तपास ठाणेदार गुलाबराव वाघ करीत आहेत.

दरम्यान दि. २२ फेब्रुवारीच्या रात्री जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळं पाटील, डी.वाय.एस.पी महामुनी हे चिखली

येथे दाखल झाले होते. याप्रकरणी पोलीसांनी धरपकड सुरुं केली असून सर्व परिस्थीतीवर पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळं पाटील लक्ष ठेवून आहेत. शहरात तणावपुर्ण शांतता आहे.

भाजपा व कॉंग्रेस कार्यकर्ते समोरासमोर, शहरात तणावपूर्ण शांतता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *