खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्हयात आणले ३५६ किमीचे रस्ते

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ९६ कामांना दिली ग्रामविकास विभागाने मंजूरी

बीड:– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीडच्या खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३५६ किमीचे रस्ते मंजूर करून आणले आहेत. दहा तालुक्यातील रस्त्याच्या ९६ कामांना ग्रामविकास विभागाने नुकतीच मंजूरी दिली असून हे सर्व ग्रामीण रस्ते त्यांच्या प्रयत्नांमुळे चकाचक होणार आहेत.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी जिल्हयात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून मुंडे भगिनींच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हा सध्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे. खासदार या नात्याने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या विकास व संशोधन (आर अॅन्ड डी ) अंतर्गत जिल्हयातील दहा तालुक्यात ३५६ किमी लांबीच्या ९६ रस्ता कामांना मंजूरी दिली आहे. लवकरच या रस्ता कामाचा शुभारंभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *