हिंदू मुलीचे अपहरण – जावेद शेख नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल

बीड:–

बीड च्या अंबाजोगाईत भर दिवसा सिने स्टाईल पद्धतीने मुस्लिम युवकाने हिंदू युवतीचे केले अपहरण, या धक्कादायक घटनेमुळे संबंध जिल्हा हादरून गेला आहे
हिंदुस्थानात लव्ह जिहाद पुन्हा डोके वर काढू लागला आहे.सिरसाळा येथील एका हिंदू तरुणीला अंबाजोगाई शहरातुन मुस्लिम युवकाने फूस लावून पळवल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.या मुलीला याआधीही याच तरुणाने काही दिवसांपूर्वी सिरसाळ्यातुन फुस लावून पळविले होते.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय युवतीला जावेद निझाम शेख या अवैध धंदे करणाऱ्या युवकाने डिसेंबर २०१८ मध्ये फूस लावून पळविले होते.
या प्रकरणात सिरसाळा येथील पोलिसांनी लक्ष दिले नव्हते मात्र शिवसेना तालुकाप्रमुख व्येंकटेश शिंदे यांनी याप्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून बीड पोलीस अधीक्षकांच्या कानावर ही बाब घातल्याने मुलीला तिच्या आई वडिलांना सुपूर्त करण्यात आले होते,
पण मुलाच्या कुटुंबियांची राजकीय पकड मजबूत असल्याकारणामुळे, उलट मुलीच्या बाजूने सहकार्य करणाऱ्या काही हिंदू युवकवर्ती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना परेशान केल्या गेले, या भीतीपोटी
मुलीच्या वडिलांनी सिरसाळ्यातील गावगुंडांच्या भितीने आपले संपूर्ण कुटुंब अंबाजोगाई येथे हलवले.मात्र जावेद निझाम शेख याने काही दिवसातच गुंडांच्या मदतीने मुलीचा शोध घेत गुरुवार दि.३१ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास मुलगी व तिची बहीण कॉम्पुटर क्लास ला जात असताना भर दिवस सिने स्टाईल ने तिचे अपहरण केले. या घटनेमुळे संबंध जिल्हा तसेच मुलीचे आई वडील व नातेवाईक पूर्ण हादरून गेले आहेत दुसऱ्या वेळेसही युवक आणि त्यांच्या गुंड मित्रांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुलीच्या वडिलांना पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशन च्या चक्कर काटाव्या लागल्या शेवटी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे जावे लागल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले .
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलाम 366, 323,34 अंतर्गत जावेद निजाम शेख व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या मित्रावर्ती गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीचा शोध सुरू आहे या सर्व प्रकरणानंतर सिरसाळा-अंबाजोगाई परिसरात मोठा तणाव पसरला असून मुलीचे आई वडील मुलीच्या प्रतीक्षेत आस लावून बसले आहेत.जर लवकरात लवकर मुलीला शोधून आणले नाही तर मुलीचे आई वडील आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणाले.राज्याच्या महिला व बाल विकास मंत्र्याच्या मतदार संघात जर मुली सोबत अश्या घटना घडणे हा एक मोठा प्रश्न जनतेतून उपस्थित होतांना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *