हेक्टरी ८हजार मदत तुटपुंजी; शेतकर्याच्या जखमेवर मीट चोळु नये–विनायक सरनाईक

बुलढाणा ( योगेश शर्मा )
.

rainअवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकर्याना राज्यपाल यांनी खरीप पिकासाठी हेक्टरी ८हजारांची,तर फळबागांसाठी हेक्टरी१८हजार रुपयांची मदत जाहिर केली आहे.त्याच सोबत नुकसानग्रस्त शेतकर्याच्या मुलांची शाळा-काँलेजची परीक्षा फीदेखील माफ करण्यात आली आहे.परंतु राज्यपालांनी जाहिर केलेली मदत हि अतिशय तुटपुंजी असुन हा एक प्रकारे शेतकर्याच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे.शेतकर्यानी केलेल्या लागवडीचा खर्च हि यातुन निघणार नाही त्यामुळे या रकमेत भारीव वाढ करावी अशी मागणी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांनी केली आहे.
गत चार वर्षापासुन शेतकर्यानी कोरडा दुष्काळ अनुभवला.पाऊसच नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही.यावर्षी सुरुवाती पासुन पाऊस चांगला पडुन पिकांची वाढ चांगली झाली.खास करुन सोयाबीन उत्पादक शेतकर्याना मोठी आशा होती;परंतु गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे सोयाबीनसह इतर पिक व फळबागांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्याच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले;अनेकांचे भरुण न निघणारे नुकसान झाले आहे.शेतकर्याचे जगणे-मरणे शेतीवर अवलंबुन असते.शेतात बहरलेले पीक त्याचे सर्वस्व असते.या पिकावरच शेतकर्याची संसाराची स्वप्ने रंगलेली असतात.मात्र यंदाच्या हंगामातत ‘अवकाळी ‘पावसाने घाला घातला.एकुणच शेतकर्याचे हातातोडांशी आलेले पीक काढणी होण्यापुर्वीच काहिंचे शेतात उभे सडले तर काहिच्या सुड्या लागल्याची परीस्थीती आहे.सद्या परीस्थीती पाहता एकरी सोंगणीचा खर्च ३ हजार रु मळणीयंत्रातुन काढणीचा खर्च हाच खर्च ८हजारावर जातो मशागत करणे पेरणी करणे हा जर खर्च काढला तर राज्यपाल यांनी जाहिर केलेली हेक्टरी ८हजाराची मदत हि तुटपुंजी असुन हा एक प्रकारे शेतकर्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.त्यामुळे शेतकर्याना भारीव मदतीची अपेक्षा आहे.कुठलेही निकष न लावता शेतकर्याना वाढिव ४२हजाराची हेक्टरी मदत देण्यात यावी,अशी मागणी रयत चे जिल्हाध्यक्ष तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांनी केली आहे.याबाबद विद्यापाठीचे सर्व सदस्य राज्यपालांकडे याबाबद मागणी करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *