रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाण्याचे अनुदानावर मुबलक प्रमाणात वाटप करा.

नांदेड . दि.15 (अरविंद जाधव)

नांदेड जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात येण्याची आशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना निर्माण झाली आहे,जमिनीत ओलावा असल्यामुळे हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल वाढला आहे,बाजारात मात्र हरभरा बियाण्याची कृतीम टंचाई करून व्यापारी हरभरा बियाण्याची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहे, त्यामुळे कृषी विभागाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर मुबलक प्रमाणात हरभरा बियाणे वाटप करावे अशा मागणी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य भागवत देवसरकर यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना भेटून केली आहे.

हरभरा बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे, खरिपाचा हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते तसेच बाजारात असलेल्या बियाण्याची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी करण अशक्य असल्यामुळे कृषी विभागाने महाबिज मार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानावर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणीसाठी बियाणे द्यावे या मागणीसाठी व बाजारात हरबरा बियाण्याचा तुटवडा असल्याचे भागवत देवसरकर यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी आज प्रत्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे,महाबीजचे विभागीय व्यवस्थापक निकम व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन बियाण्याच्या उपलब्धतेबाबत व टंचाई बाबत चर्चा केली व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बियाणे उपलब्ध करून द्यावे ही मागणी केली,या मागणीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन येत्या काळात पाच हजार क्विंटल हरभरा बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. बियाणे शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध झालं तर येत्या काळात शेतकऱ्यांना हरभरा बियाण्याचे टंचाई जाणवनार नाही व व शेतकऱ्यांना बाजारात बियाने उपलब्ध नसल्याने होणाऱ्या मानसिक त्रासापासून सुटका होईल असे भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *