नवी मुंबई

घरांच्या शोधात असलेल्या नागरिकांना सिडकोने दिला वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुखद धक्का. तळोजा, खारघर, घणसोली, कळंबोली आणि द्रोणागिरीमध्ये एक हजार 100 घरांची लॉटरी सिडकोने जाहीर केली असुन . या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . योजनेची सोडत येत्या 14 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. ,सिडको मधिल ही सर्व घरे खुल्या वर्गासाठी आहेत.

सिडकोने नुकत्याच काढलेल्या 15 हजार घरांच्या लॉटरीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद दिला होता. मात्र त्या सोडतीत अनेकांना घर मिळाली नाही, ज्यांना गेल्या सोडतीत सहभाग घेता आला नाही. त्यांच्यासाठी ही अकराशे घरांची लॉटरी तातडीने जाहीर करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त दिली.

पुन्हा नोंदणीची गरज नाही
ऑगस्ट 2018 मध्ये सिडकोने जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेसाठी ज्या अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. त्यांना पुन्हा नोंदणीची गरज नसून त्यांना आपल्या पूर्वीच्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करता येणार आहे, अशी माहिती सिडकोचे पणन व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी दिली आहे.

या गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया आज पासून सुरू झाली असून ती येत्या 31 जानेवारीपर्यंत सुरू राहील.
अर्जाची नोंदणी येत्या 30 जानेवारीपर्यंत करता येणार असून अनामत रक्कम येत्या 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरता येणार आहे.
अर्जदारांची यादी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. तर अंतिम यादी येत्या 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
या गृहनिर्माण योजनेची सोडत 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बेलापूर सीबीडी येथील सिडको भवनमध्ये काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता विजेत्या अर्जदारांची नावे संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *