न.प.प्रशासनासह शासनाची फसवणुक भुमाफियांच्या यादीत आता चक्क न.प.सदस्या…

बुलडाणा ( योगेश शर्मा )

चिखली शहरातील भुखंड हेराफेरीचे प्रकरण पुर्ण महाराष्ट्रभर गाजलेले ओह. काही वर्षांआगोदर महाराष्ट्रातील २५८ प्रकरणापैकी १९८ प्रकरण फक्त चिखली न.प.हद्दीतील असल्याने चिखलीतील भुमाफियांची हिम्मत किती आहे की जे प्रशासनाला व कायद्याला सुध्दा जुमानत नाही. अशाच ऐका प्रकरणापैकी शहरातील भुसंपादन क्षेत्रातील भुमाफियांच्या गर्दीत आता चक्क विद्यमान न.प.सदस्य शामील झाल्याने जनतेकडुन निवडुन दिलेल्या जनसेवकांबाबत जनतेतुन रोष व्यक्त होत आहे. चिखली नगर परिषदेचा बांधकाम विभाग विविध विषयांबाबत आणी संबंधीत विभांगांतर्गत नेहमीच्या दिरंगाईमुळे चर्चेत राहत आले आहे. तुर्तास चिखली शहरातील प्रभाग १० च्या नगरसेविका सौ.अर्चना सतिष खबुतरे यांनी शहरातील न.प.हद्दीतील शेत सर्व्हे नं.१४५/२ मधील १.४१ हे.आर. जमीन अकृषक करण्यासाठी (एन.ए.पी.३४) न.प. ला अर्ज सादर करून आवश्यक सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडली होती. या प्रकरणी चिखली तहसिलचे तत्कालीन तहसिलदार मनिष गायकवाड आणी तत्कालीन तथा विद्यमान मुख्याअधिकारी अभिजीत वायकोस यांनी आदेश पारीत करत सदर जमीन अकृषक करून रीतसर परवानगी तथा सनद सौ.अर्चना सतिष खबुतरे यांना सुपुर्द केली होती. तदनंतर सौ.अर्चना सतिष खबुतरे यांनी या सदर लेआऊटमधील प्लॉटची विक्री करणे सुरू केले होते, मात्र आता उशिरा का होईना न.प.प्रशासनाला आता खडबडुन जाग आले असुन तो भुखंड ग्रिन झोन अंतर्गत येत असल्याचे कागदोपत्री निदर्शनास आले आहे. मात्र मजेशीर बाब म्हणजे मुख्याधिकारी व तहसिलदार यांच्या पत्रांन्वये चिखली शहर मंजुर विकास आराखडया नुसार शेत सर्व्हे क्र.१४५/२ चे सौ.अर्चना सतिष खबुतरे यांचे नावे असलेले क्षेत्र हे ग्रिनझोन मध्ये असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे चुकीचा लोकेशन प्लान दाखवुन सौ.अर्चना सतिष खबुतरे यांनी ग्रिनझोन मधील भुखंड रहीवासी झोनमध्ये दाखवुन न.प.तथा शासनाची सुध्दा फसवणुक केले असल्याचे म्हटले आहे.
या बाबत अधिकवृत्त असे की सदर भुखंडावरील सौ.अर्चना सतिष खबुतरे यांनी त्या भुंखंडावरील काही प्लॉटची रितसर विक्री केल्याचे निदर्शनास आले. मात्र आता या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाल्यावर सदर भुखंड हा ग्रिनझोन चा असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर बाबीची प्रशासनाकडुन सौ.अर्चना सतिष खबुतरे यांना लेखी विचारणा केली असता त्या म्हणाल्या की आम्हाला सदर भुखंड ग्रिनझोन आहे याबाबतची काही कल्पना ही नव्हती आणि याबद्दलची माहिती संबंधीत विभागाने सुद्धा आम्हाला दिली नव्हती, या बाबत आम्ही अनभिज्ञ होतो. सदर भुखंड हा अकृषक झाला होता त्या नुसार बऱ्याच प्लॉटची खरेदी विक्रिचे व्यवहार रितसर करण्यात आले. सदर बाबी बाबत आम्हास अवगत सुध्दा संबंधीत विभागने केलेले नाहीे त्या मुळे सदर प्रकरणी आमचीच फसगत झाली आहे.
मात्र या प्रकरणी न.प.मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांनी सावधगीरीचा पवित्रा घेत सांगीतले की, जो व्यक्ती आपल्या मालकीच्या भुखंडावरील आरक्षण मंत्रालय आणी वरीष्ठ विभागाकडुन काढून आणू शकतो, त्यास आपल्या भूखंडावर ग्रीन झोन असल्या बद्दलची माहिती नसणे हे कसे शक्य आहे.? तसेच तुम्ही या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करणार असे प्रश्न विचारल्यावर मुख्याधिकारी वायकोस म्हणाले की, आम्ही न.प.च्या अभिवक्ता यांच्याशी या प्रकारणा बाबत चर्चा करुन शासनाच्या नियमानुसार कारवाई करु तसेच या चुकीमध्ये संमीलीत असलेल्या प्रत्येकाची चौकशी होईल असे सांगीतले.
सदर प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आता नागरिकांची मागणी होत आहे की, जर खरच आपल्या पदाचा दुरुउपयोग करून न.प. सदस्याने शासनाची फसवणूक केल्याचे खुद्द प्रशासनाचे अधिकारीच म्हणत असेल तर संबंधितावर कारवाई होणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी ही मांगणी नागरिक करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *