राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प.

ऑनलाईन पध्दतीने करावी लागणार रोपांची मागणी

अमरावती : यंदा राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविला जाणार असुन , या उपक्रमांतर्गत रोपांची मागणी ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी लागेल. रोपांबाबत ऑफलाईन प्रक्रिया बंद झाली करण्यात आली असून, वेळेवर किंवा मौखिक मागणीनुसार रोपे उपलब्ध होणार नाहीत, असे पत्र वनविभागाने जारी केल आहे. तसेच वनविभागाचा संकेतस्थळावर रोपांची मागणी नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सामाजिक वनीकरण आणि इतर शासकीय, प्रशासकीय ४६ यंत्रणांच्या सहकार्याने ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्यासाठी आतापासून वनाधिकाऱ्यांनी बैठक सत्र चालविले आहे. वनविभागाचे प्रधान मुख्य सचिव विकास खारगे हे ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने राज्याच्या सहा विभागांत आढावा बैठकीतून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेँण्यात येत आहे. यावेळी पहिल्यांदाच रेल्वेच्या खुल्या जागांवरही वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार आहे. परंतु, ऑनलाईन नोंदनी केल्या शिवाय रोपे मिळनार नाहीत अशी स्पष्ट भुमिका वनविभागाने घेतली आहे..

वनविभागाने विविध यंत्रणांना पत्र पाठवून डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.महाफॉरेस्ट.इन या संकेतस्थळावर रोपांची नोंदणी करण्याचे आवाहन केल आहे. यंदा वनविभागाच ३३ कोटी वृक्षलागवड उद्दिष्ट आहे.
शाळा , महाविद्यालयांना वनविभागाने सहभागी होण्याच केल आवाहन
शाळा महाविद्यालयांना 33 कोटी वूक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वनिकरण विभागाने पत्रव्यवहार चालविला आहे. मोहीम जागतिक कीर्तीमान करण्यासाठी वनविभागाने नियोजनबध्द आखणी चालवली आहे.
आमरावती विभागाने 71.82 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवल आहे तरी त्या पेक्षा आधिक वृक्षलागवडीसाठी अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी जोरदार तयारी केली असल्याच सांगितल……….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *