सहा राज्यांत दिले जाणार नवे प्रदेशाध्यक्ष..

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून लोकसभा निवडणुकांची रणनिती आखण्यात येत आहे. पाच पैकी तीन राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता तेथील प्रदेशाध्यक्ष बदलांच्या हालाचाली सुरु आहेत. तर, सोबतच उत्तर प्रदेश, , छत्तीसगढ आणि हरयाणातही काँग्रेकडून नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याच समजते.

संसदेच हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे सर्वच पक्षाचे प्रमुख नेते व्यस्त असणार आहेत. 8 जानेवारीला संसदेच हिवाळी अधिवेशन संपणार असुन त्यानतंर राहुल गांधी विेदेश दौऱ्यावर जाणार आहेत .विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर राहुल गांधी 6 राज्यांच्या प्रदेशाध्यांची निवड करणार आहेत . आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करुन पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी काँग्रेसची ही रणनिती असणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तीन राज्यांत सत्ता स्थापन केली आहे.त्यानुसार ,मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे तर राजस्थान मध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री बनले आहेत.

भुपेश बघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनले आहेत . त्यांमुळे .या तीन राज्यात प्रदेशाध्यपदी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.तर हरियाणा मध्ये अशोक तंवर यांचा कार्यकाळ पुर्ण झाला असुन तेथे देखील नवीन चेहऱ्यांला संधी देण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अध्यक्ष बदल निश्चित असुन येथील प्रदेशाध्यक्ष राज बब्बर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांमुळे त्यांचा जागी नवीन अध्यक्ष निवडला जाईल.

छत्तीसगडचे प्रभारी पीएल पुनिया उत्तर प्रदेशमध्ये जाण्यास ईच्छुक आहेत. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेसचे संघटनेचे एक पद रिक्त असुन . अशोक गहलोत मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक नेते या पदासाठी लाईनीत उभे आहेत. त्यामुळे हेही पद लवकरच नवीन चेहऱ्याकडे जाईल, असे दिसून येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *